8मार्च 2020 जागतिक महिला दिन या पवित्र दिना निमित्त एका तमिल महिलेने पाठविलेल्या सदिच्छा. (Compliment from a Tamil women on the auspicious of Women’s Day 2020)

Insta Dm

ओह !!! तुमचे खूप खूप धन्यवाद अक्का.

बरेच पुरुष हे कोमल हृदयाचेच असतात, कारण त्यांचे संगोपन बहुतांशी स्त्रियाच करतात. घरात आई तर शाळेमध्ये बहुतेक करून शिक्षिका त्यांना संस्कारित करतात.

मात्र वाढत्या वयाबरोबर भोवतालची परिस्थिती, मित्र, आजूबाजूचा बरा-वाईट समाज व त्याचे येणारे कटू-गोड अनुभव, यांमुळे बरेच पुरुष बदलतात. आपल्याकडे म्हणच आहे – ज्याचा जैसा अनुभव त्याचा तैसा भाव. म्हणजे माणसाला स्वतःला जशी वागणूक मिळते, तसेच वर्तन तो इतरांशी करतो. त्याच्या मातेचे किंवा शिक्षिकेचे संस्कार हे त्याच्या मनात खोलवर रुजलेले असतातच, मात्र सार्वजनिक ठिकाणी लोकांची मानसिकता व त्यांची पार्श्वभूमी यानुसार त्यांचे वर्तन होताना दिसते. मात्र कधी कधी ‘शठ प्रती शाठ्यम’ या उक्तीनुसार ज्या शठांना प्रेम व संस्काराची भाषा समजत नाही, त्यांना तशाच भाषेत सांगणे देखील आवश्यक असते.

सांप्रत काळी प्रतिष्ठा मिळवणे हे सहजसाध्य नाहीये. त्यासाठी बरीच तपश्चर्या करावी लागते. मात्र एखादी छोटीशी अफवा देखील तुमची सारी प्रतिष्ठा धुळीस मिळवू शकते. लोक तुमच्याबद्दल नेहमीच प्रवाद पसरवण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करतात. मात्र सार्‍यावर तुम्ही सदा हसतमुखाने मात करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. सज्जन लोकांबद्दल सतत खोट्या बातम्या पसरविणे हे रिकामटेकड्या व द्वेषमूलक लोकांचे कामच असते आणि हलक्या कानाची लोक अगदी सहज अशा खोट्या प्रचाराला बळी पडतात.

पुण्यात काही स्वयंघोषित सरदार घराणी आहेत, ज्यांना राजे-रजवाड्यांच्या पोषाखात लग्नसमारंभात मिरविणे एवढे एकच काम आहे असे वाटते. काहीतर अगदी विना आमंत्रण देखील बिनदिक्कत विवाहसमारंभाना हजर राहतात. काही मंडळी आपण एखाद्या नामांकित सरदार घराण्याचे वंशज आहोत असे दडपून सांगत फिरतात, तर काही सज्जन एखाद्या घराण्याचा इतिहास, त्याच कर्तृत्व याचा कसलाही गंध नसताना त्या नावाचा वापर करताना दिसतात. या मंडळींचा एकमेव उद्योग म्हणजे सज्जनांच्या पाठी त्यांच्या कुचाळक्या करणे, विशेषतः समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या राज परिवाराबद्दल अफवा पसरविण्यात त्यांना फारच असुरी आनंद मिळतो. वस्तुतः या मंडळींना शिवराय व भोसले राजपरिवारा बद्दल कसलेही प्रेम वा आदर नसतो. मात्र स्वतःच्या कसल्यातरी क्षुद्र स्वार्थासाठी ही मंडळी शिवरायांबद्दल व त्यांच्या वंशजाबद्दल प्रेम व आदराचे नाटक करीत असतात.

(टीप: हा माझा वैयक्तिक अनुभव व निरीक्षण आहे. कदाचित हे वाचून आपणास धक्का बसेल, जसा तो सुरुवातीस मलाही बसला होता.)

केवळ भरजरी व राजसी पोशाख घातल्याने कोणी एखाद्य नामांकित राजघराण्याचे खरे वारसदार होत नाही. खरे कोण व खोटे कोण हे तुमचे वर्तन व मानसिकता पाहून लोक ठरवतात. अशा प्रकारे भपकेबाज वर्तन करण्यापेक्षा आपला काही वेळ या मंडळींनी सत्य इतिहास समजावून घेणे व त्याचा प्रसार, प्रचार करणे या कामी खर्च केला तर ही मंडळी जी नावे लावतात ती सार्थकी लागतील. केवळ नामांकित घराण्यांची नावे वापरून प्रसिद्धी मिळवण्याचा सोपा राजमार्ग वापरण्या पेक्षा स्वकर्तृत्वाने व स्वतःच्या गुणांच्या जोरावर समाजमान्यता मिळवण्यात व समाजाचे कल्याण करण्यातच खरा पुरुषार्थ आहे.

वरील संदेश हा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण तो देणारी व्यक्ती ही केवळ तोंडदेख संदेश देणार नाही. अशा एखाद्या महनीय स्त्रीने एका पुरुषाची मनापासून स्तुती करणे व ते ही महिला दिनाचे औचित्य साधून ही माझ्यासाठी अतिशय गौरवाची बाब आहे. मला हा सन्मान एका तमीळ भगिनीने दिला आहे. तमिळ भगिनी या परंपरावादी व काहीशा मीतभाषी असतात. उगाचच एखाद्याची खोटी स्तुती करणे हा त्यांचा स्वभाव नसतो. आणि म्हणूनच हा सन्मान माझ्यासाठी अतिशय खास आहे. मुळात सारेच दक्षिण भारतीय बांधव हे एखाद्या व्यक्तीचं समाजकार्य, त्याची गुणसंपदा व त्याची समाजाची असणारी बांधिलकी यावरून मूल्यमापन करतात. एखादी व्यक्ती केवळ विशिष्ट राजघराण्यातील व त्याच्याशी संबंधित असणे हा काही त्यांच्यासाठी गौरवाचा निकष नसतो. एखाद्याच्या राजवैभवाचा व त्याच्या संपन्नतेचे ते कौतुक करतीलही मात्र ते करताना त्यात कोणताही वैयक्तीक स्वार्थ व संधीसाधूपणा नसेल हे निश्चित.

****************************

Aww!!! thank you so much for this compliment Akka (Tamil word for elder sister). So sweet of you.

All men are gentle because they are been raised by a women. At home by mother and at school by teachers who are mostly women.

Men do change because of the circumstances or because of the people with whom they are with in their surroundings and their attitude changes because of worst experience that might been faced or caused by someone. There is a saying, people treat others based on how they were been treated. Their mother’s or Teacher’s teachings or given sanskar (hindi word) is always with them and is strongly inbuilt in their roots, but when in public- they do show it based on people’s ATTITUDE or BACKGROUND and it is dependent on it. Sometimes being sanskari or gentle with someone who doesn’t even knows anything about it would give no any good result or mean for being gentle with them. Sometimes we have to react with them in their way of manner or attitude in which they understand.

Earning a good name is not so easy. But destroying a good name is very easy, just by spreading rumors or gossip, the work is done. There is a very famous saying, ‘People will always spread rumours about you; People will always cause drama involving you; But the only thing you can do is raise above them and smile’. Haters and jobless people are those who spread rumours and gossip; fools are those who get carried away or believe the false without cross checking or verifying it.

There are some self proclaimed Sardar families in Pune who only have a job of attending marriages wearing royal attire. Some also attend marriages without even being invited, some also claim that they are the actual descendents of good reputed sardar family, some also use prominent surnames without even knowing the history of it or may not be associated with the actual Palace or lineage; their only job is to gossip or spread rumours about someone, especially of those who do good for the sake of history or society. In real, such people don’t even have respect to Shivaray nor to the Raje Bhonsle royal families. They just use Shivaray’s name and show as if they have respect towards his descendents for their own benefits and to self proclaim.

(Note: I am writing this on what I have observed, you might been shocked after reading this, even I was – when I came across such observations)

It will not get proved after wearing royal attire- the one can be turned into actual heir or descendent of prominent or renowned family they claim to be as. Behavior and Attitude shows who are real and fake.

Instead of doing that, they should atleast spend some good quality time on researching and spreading authentic history about whose surname they portrait after their names.

Instead of earning names by short cut method or using renowned family surnames. They should earn it and make their own name in the society by using their self qualities, intellectual skills or doing good and social service.

This above message which I received is very special to me as it was not sent by the sender just for the sake of sending, she had appreciated me from her heart that too on the special occasion of Women’s day. She is a #Tamil women and it is to be noted that most of the Tamil girls or women belong to orthodox, reserved or conservative backgrounds. They don’t appreciate anyone so easily. Getting appreciation from them is truly a big honour. Mostly people in South India compliment others based on their human works, individual efforts or for inbuilt qualities that they had developed and gratitude, not for one’s royalty or wealth. Some may appreciate for one’s wealth or royalty, but it is been done for his/her own benefits or advantage from them.

*********

Translated in Marathi by Shri. Santosh Jadhav and Typed and helped by Shri. Ankur Kale. Special Thanks to Hemant Zunjarrao.

© prataprpb.wordpress.com

#Insta_DM #Compliment #Womensday #Tamilwomen

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s